अकोले तालुक्‍यातील खानापूर येथील आदिवासी महिलेवर बलात्कार व खून प्रकरणातील मुख्य आरोपीस अटक करावी, यासाठी भाजपच्या चित्रा वाघ यांनी आंदोलनाचा इशारा दिला होता.
अकोले तालुक्‍यातील खानापूर येथील आदिवासी महिलेवर बलात्कार व खून प्रकरणातील मुख्य आरोपीस अटक करावी, यासाठी भाजपच्या चित्रा वाघ यांनी आंदोलनाचा इशारा दिला होता.  
नगर

चित्रा वाघ यांचा आंदोलनाचा इशारा कामी आला

सरकारनामा ब्युरो

अकोले : तालुक्‍यातील खानापूर येथील आदिवासी महिलेवर बलात्कार व खून प्रकरणातील मुख्य आरोपीस आज पोलिसांनी म्हाळादेवी येथून अटक केली. सोमनाथ बाळासाहेब गायकवाड (वय 30, रा. टाकळी), असे त्याचे नाव आहे. 

याप्रकरणी भाजपच्या चित्रा वाघ यांनी आंदोलनाचा इशारा दिला होता. अकोले येथे येऊन संबंधित महिलेच्या कुटुंबियांची भेट घेवून आरोपींना अटक झाली नाही, तर आंदोलनाचा इशारा दिला होता. आता मुख्य आरोपीच पकडल्याने वाघ यांना आंदोलनाची गरज पडणार नाही.


या प्रकरणी संबंधित कुटुंबियांना शिवसेनेचे खासदार सदाशिव लोखंडे, भाजपचे माजी आमदार वैभव पिचड यांनीही भेट देवून संबंधित आरोपींना तातडीने अटक करावी, अशी मागणी केली होती. दरम्यान, या प्रकरणाचा तपास गुप्तचर विभागाकडून व्हावा, अशी मागणी खासदार लोखंडे यांनी केली आहे. 

चोरायचा होता बोकड पण...
बोकड चोरण्यासाठी आरोपी गायकवाड गेला होता. त्या वेळी आदिवासी महिलेला पाहून त्याची नियत बदलली. त्याने अत्याचार करून तिचा खून केल्याचे तपासात समोर आले. प्रथमवर्ग न्यायदंडाधिकाऱ्यांनी गायकवाड याला पाच दिवसांची (ता. 20पर्यंत) पोलिस कोठडी सुनावली.

खानापूर शिवारात आठ मार्च रोजी आदिवासी विवाहितेचा मृतदेह आढळून आला होता. उत्तरीय तपासणीत बलात्कारानंतर तिचा खून झाल्याचे समोर आले. या घटनेनंतर आदिवासी समाजाने संताप व्यक्त करीत तहसील कार्यालयावर मोर्चा काढला. त्यामुळे गुन्ह्याची उकल करण्याचे आव्हान पोलिसांसमोर उभे होते. 

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT